THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday 2 March 2017

भाषा विकास 1 - वाचन पुर्वतयारी




आपल्या अध्यापनामध्ये खास ज्ञानरचनावाद पध्दतीचा उपयोग करु इच्छिणाऱ्यांसाठी

��वाचन अधिगम विद्यार्थी, डिस्लेक्सिया, मुखदुर्बल, मतिमंद, वाचादोष, मतिमंद अशा विशेष विद्यार्थ्यांनाही हीपध्दती थोड्याफार फरकाने वापरता येते.
��पहिला टप्पा�
� वाचन पुर्वतयारी �

�या टप्प्यात खालील प्रकारे वाचनपुर्व तयारी करुन घ्यावी.1.नजरेने आकारातील साम्यभेद ओळखणे
.2. साम्यभेदाआधारे चित्रवाचन करणे
.3.परिचीत चित्रांसोबत त्याच्या शब्दकार्डांचे अंदाजे वाचन करणे
.4.वाचनासाठी डावीकडुन उजवीकडे नजर फिरविण्याचा सराव.
5. बोललेले शब्द डावीकडुन उजवीकडे लिहिले जातात हे समजणे.
6. शब्दकार्डांचा संबंध चित्राशी व इतर दृश्य वस्तुशी जोडणे, याचा सराव. यासाठी आपापल्या कल्पकतेनुसार व परिस्थितीप्रमाणे विविध उपक्रम घेता येतात.

उदा- [खालील उदाहरणे नमुनादाखल आहेत]

1. आपल्या वर्गातील सर्व मुलांच्या नावाचे नामपट्या बनवून घ्या. या नाम पट्या त्यांना हाताळण्यास द्या. उपस्थित विद्यार्थीनी आपापल्या नावाचे टँग भिंतीस लावण्यास सांगणे.सर्व पट्या एकत्रीत करुन त्यामधून स्वतःच्या नावाची नामपट्टी ओळखण्यास सांगणे. नंतर नंतर इतर विद्यार्थ्यांच्या नामपट्या ओळखण्यास सांगणे. मुले स्वतःचे व इतराचे नाव चार दिवसात ओळखण्यास वाचण्यास शिकतात.

2. वर्गातील वस्तुंच्या नामपट्या दोन संचामध्ये तयार करुन घ्या.एक संचातील पट्ट्या वस्तूंना डकवा. दुसऱ्या संचातील पट्ट्या मुलास द्या. तुझ्या पट्टीवर जे नाव लिहिले आहे ती वस्तू शोधण्यास  सांगणे. किंवा एखाद्या वस्तूची नामपट्टी शोधून काढण्यास सांगणे
.3. परिचित चित्रांचा व त्याच्या नामपट्यांचा वापर करुन विविध खेळ घेऊ शकतो.-सलग तीन दिवस मुलांना चित्र व त्याखाली शब्दकार्ड लावून वाचन करुन घ्या. नंतर चित्राखाली बोट ठेवुन नावाचेवाचन घ्या. सर्वांस शब्दकार्ड वाटा.व एकच चित्रकार्ड दाखवुन याचे नाव कोणाकडे आहे त्याला पुढे बोलवा. चित्रशब्दकार्डाखाली लावुन खात्री करु द्या.अशीच सर्व चित्रशब्दकार्ड शोधण्याचा सराव घेणे.पुढील तीन दिवस शब्दकार्डाची शब्दकार्डाशी जोड्या लावणेखेळ घेणे.पुढील तीन दिवस शब्दकार्डाची चित्रकार्डाशी जोडी लावणे.-चित्रपट्टीच्या खाली इतर चित्रांचे नाव टाका. अशा खुप चित्रपट्या बनवा. आता एक चित्रपट्टी विद्यार्थ्यांस द्या.व त्याखालील नाव वाचून त्याचे चित्र असणारी चित्रपट्टी शोधून त्यासमोर लावा. आता या चित्रपट्टीच्याखालील नावानुसार पुढील चित्र, त्यानंतर त्यापुढील चित्र अशी चित्रांची आगगाडी बनविण्यास सांगा.-असे अनेक चित्र-शब्द खेळ घेता येतात. शब्द मर्यादेमुळे सर्व येथे मांडणे शक्य नाही.

7. दहा शब्द झाले की, वाक्यवाचन सुरु करावे.उदा- हा आंबा(चित्र)आहे. असे वाचन करणे. नंतर चित्राजागेवर शब्द ठेवुन वाक्य वाचनाचा सराव घेणे.

8. दृकशब्दसंपत्ती वाढ ४० पर्यंत जाणे ही वाचनपुर्वतयारी झाली. इथपर्यंत मुले अंदाजाने वाचतात पुर्ण शब्द वाचतात.पण हे प्रत्यक्ष वाचन नव्हे.

9. प्रत्यक्षवाचनासाठी मुले शब्दाचा एकत्रित विचार करतात व वाचन सुलभ होते.----------------------------------------

No comments:

Post a Comment